शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही", अमित शाहांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:52 IST

Amit Shah on CAA : २०२६ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा दावा

नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) पुन्हा चर्चेत आले आहे. बुधवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए संदर्भात मोठे विधान केले. आम्ही बंगालमध्ये सीएए आणणारच. हा देशाचा कायदा असून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांच्या सरकारवर अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला.

बंगालच्या जनतेने ठरवले आहे की, पुढचे सरकार भाजपच बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनतेला लाखो रुपये पाठवतात, पण तृणमूल काँग्रेस हे पैसे गरिबांपर्यंत पोहोचू देत नाही. तसेच, बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान सर्वाधिक हिंसाचार होताना दिसतो. बंगालमध्ये घुसखोरी थांबवली जात नाही. बंगालमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज येतायेत, असे अमित शाह म्हणाले.

बंगालमध्ये कम्युनिस्टांनी २७ वर्षे राज्य केले. तिसऱ्या टर्ममध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले. दोघांनी मिळून बंगालला संपवण्याचे काम केले. संपूर्ण देशात निवडणुकीतील हिंसाचार बंगालमध्ये सर्वाधिक आहे. ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरी रोखू शकलेल्या नाहीत. राज्यात घुसखोरांना मतदार कार्ड आणि आधार कार्ड खुलेआम वाटले जात असून यावर ममता बॅनर्जी गप्प बसल्या आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला.

सोनार बांगला आणि माँ माटी मानुषचा नारा देत कम्युनिस्टांना हटवून ममता दीदी सत्तेवर आल्या. पण बंगालमध्ये बदल झाला नाही. आजही बंगालमध्ये घुसखोरी, तुष्टीकरण, राजकीय हिंसाचार आणि भ्रष्टाचार होत आहे. ज्या बंगालमध्ये एकेकाळी रवींद्र संगीत ऐकू येत होते, ते आज बॉम्बस्फोटांनी गुंजत आहे. संपूर्ण देशातून गरिबी हटवली जात आहे, पण बंगालमध्ये तसे होताना दिसत नाही. बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

२०२६ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा दावाअमित शाह म्हणाले की, "२०२६ च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचे सरकार दोन तृतीयांश बहुमताने स्थापन होईल. पण त्याआधी २०२४ च्या निवडणुका येत आहेत. २०१९ मध्ये तुम्ही १८ जागा जिंकून भाजपला दिल्या होत्या. पण, मी तुम्हाला २०२४ मध्ये इतक्या जागा देण्याची विनंती करायला आलो आहे की, मोदींना शपथ घेतल्यानंतर म्हणावे लागेल की, मी बंगालमुळे पंतप्रधान झालो आहे."

टॅग्स :Amit Shahअमित शाहwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा