शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

“पुढील ३० ते ४० वर्षांपर्यंत राहणार भाजप युग,” राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत अमित शाहंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 16:13 IST

घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप असल्याचं शाह यांचं वक्तव्य.

“पुढील ३० ते ४० वर्षे भाजपचा काळ असेल आणि या काळात भारत विश्वगुरू बनेल. घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप आहे, जो देशासमोरील समस्यांना कारणीभूत आहे,” असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अमित शाह यांनी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर भाष्य केलं. 

तेलंगण आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजप कौटुंबिक राजवट संपवेल आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेतही येईल, असे अमित शाह म्हणाले. २०१४ पासून केंद्रात सत्तेत असलेला भाजप या राज्यांमध्ये मात्र सत्तेत नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिकसर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं शाह म्हणाले. यामध्ये दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाफीया जाफरी यांची याचिका न्यायालयानं फेटाळली होती. याचिकेत गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ लोकांना एसआयटीनं दिलेल्या क्लिन चीटला आव्हान देण्यात आलं होतं. मोदी यांनी दंगलीमध्ये आपल्या कथित भूमिकेबाबत एसआयटी तपासाचा सामना केला होता आणि संविधानावर आपला विश्वास कायम ठेवला होता असं शाह म्हणाले.

काँग्रेस हा कुटुंबाचा पक्ष झाला आहे. त्यांचे काही सदस्य पक्षाच्या आतच लोकशाहीसाठी लढत आहे. गांधी कुटुंब अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होऊ देत नाही. त्यांना पक्षावरील आपलं नियंत्रण गमावण्याची भिती आहे. विरोधक असंतुष्ट आहेत आणि सरकार जे काही चांगलं करतं, त्याचा ते विरोधच करत असतात, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा