शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

Coronavirus: केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय; कोविड उपचार घेण्यासाठी रिपोर्ट पॉझिटिव्ह येणं बंधनकारक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 16:48 IST

आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना ३ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन आणि परिपत्रक काढण्याची सूचना दिली आहे.

ठळक मुद्देकोणाकडेही ओळखपत्र नसल्या कारणाने त्याला उपचारासाठी दाखल होण्यापासून नकार दिला जाऊ शकत नाही.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संशयित कोरोना संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचाराला सुरूवात होणार आहे.केंद्र सरकारने खासगी रुग्णालयासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत

नवी दिल्ली – कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना कोविड फॅसिलिटीत दाखल करण्यासाठीच्या राष्ट्रीय धोरणात बदल केला आहे. आता कोविड आरोग्य सुविधेसाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे बंधनकारक नाही. रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन सरकारने हे पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संशयित कोरोना संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचाराला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत कोविड सुविधेत दाखल होण्यासाठी केवळ कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे आवश्यक होतं. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत. या आदेशात म्हटलंय की, ज्या रुग्णांना कोविडचा संशय वाटतो अशांना CCC, DCHC या संशयित वार्डात दाखल करून घ्यावं. कोणत्याही रुग्णांना सेवा देण्यपासून रोखलं जाऊ शकत नाही असं केंद्राने सांगितले.

या सेवांमध्ये ऑक्सिजन अथवा आवश्यक औषधांचाही समावेश आहे. मग भलेही रुग्ण दुसऱ्या शहरातील का असू नये. कोणाकडेही ओळखपत्र नसल्या कारणाने त्याला उपचारासाठी दाखल होण्यापासून नकार दिला जाऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याला भरती केलं जाऊ शकतं. मात्र ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज नाही, विनाकारण बेड अडवून राहिलेत याची खातरजमा करून घ्यावी. याशिवाय रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत संबंधित पॉलिसीनुसार सोडावं. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना ३ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन आणि परिपत्रक काढण्याची सूचना दिली आहे.

गेल्या २४ तासांत १८ लाखांहून अधिक चाचण्या

ग्रूप ऑफ मिनिस्टर्सच्या (GoM) २५ व्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन संबोधित करत होते. "देशात सलग तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४,०१,०७८ नवे रुग्ण आढळले आहेत. पण दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की गेल्या २४ तासांत ३ लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी देखील पोहोचले आहेत. आता देशाची एका दिवसाची चाचण्यांची क्षमता २५ लाख इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १८ लाख ८ हजार ३४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत", असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशात गेल्या २४ तासांत ४ हजार १८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा एकूण मृत्यूंचा आकडा २ लाख ३८ हजार २७० वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ इतकी झाली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार