२१ जूनपासून देशात सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना केली होती. परंतु यावेळी त्यांनी ज्या नागरिकांना मोफत लस नको असेल आणि ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घ्यायची असेल त्यांना ती मिळणार असल्याचंही म्हटलं होतं. परंतु खासगी रुग्णालयांच्या दर निश्चितीला चाप लावत त्यांना केवळ १५० रूपयांचं सेवा शुल्क आकारता येऊ शकेल असं मोदी म्हणाले होते. यानंतर आता कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन (Covaxin) आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसींचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत.Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्तखासगी रुग्णाल कोविशिल्ड या लसीचा प्रति डोसा ७८० रूपयांना मिळणार आहे. याममध्ये ६०० रूपये लसीची किंमत + ५ टक्के जीएस आणि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर कोवॅक्सिन ही लस १४१० रूपयांना मिळणार असून यामध्ये (१२०० रूपये मूळ किंमत+६० रूपये जीएसटी आणि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर खासगी रुग्णालयात स्पुटनिक व्ही ही लस ११४५ रूपये प्रति डोस दरानं देण्यात येईल.
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 21:36 IST
Coronavirus Vaccine Price : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नसल्याचं म्हटलं होतं. अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात होणार कारवाई.
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित
ठळक मुद्देपंतप्रधानांनी यापूर्वी खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नसल्याचं म्हटलं होतं. अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात होणार कारवाई.