युनोने हाफिज सईदला ‘साहेब’ म्हटल्याने वाद
By Admin | Updated: December 22, 2014 03:57 IST2014-12-22T03:57:25+5:302014-12-22T03:57:25+5:30
२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड व जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद यास ‘साहेब’ म्हटल्याने नवा वाद उफाळला आहे

युनोने हाफिज सईदला ‘साहेब’ म्हटल्याने वाद
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एका समितीने २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड व जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद यास ‘साहेब’ म्हटल्याने नवा वाद उफाळला आहे. या भूमिकेवर भारत युनोकडे स्पष्टीकरण मागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेच्या समितीचे अध्यक्ष गॅरी क्वीनलॅन यांनी १७ डिसेंबर रोजी लिहिलेल्या एका पत्रात भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईद याच्यासाठी ‘साहेब’ असा शब्द वापरला आहे. युनोने डिसेंबर २००८मध्ये जमात-उद-दावाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. डिसेंबर २००८मध्येच संयुक्त राष्ट्र संघटनेने सईदवरही बंदी घातली होती. अमेरिकेने सईद व त्याच्या एका नातेवाईकावर एप्रिल २००३ मध्ये एक कोटी अमेरिकी डॉलरचे इनाम घोषित केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)