Nirmala Sitharaman: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 14:20 IST2022-12-26T14:18:28+5:302022-12-26T14:20:28+5:30
Nirmala Sitharaman Health Update: केंद्रीय वित्रमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली आहे. सीतारामन यांना सोमवारी सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nirmala Sitharaman: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली, उपचारांसाठी AIIMS मध्ये दाखल
नवी दिल्ली - केंद्रीय वित्रमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती बिघडली आहे. सीतारामन यांना सोमवारी सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्माला सीतारामन यांना दुपारी १२ च्या सुमारास एम्समधील प्रायव्हेट वॉर्डमध्ये दाखल कऱण्यात आले आहे. ६३ वर्षीय सीतारामन यांना आरोग्यासंबंधीची समस्या जाणवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, निर्माल सीतारामन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून समोर येत आहे. निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
Union Finance Minister Nirmala Sitharaman admitted to AIIMS Delhi for a routine check-up: Official sources
— ANI (@ANI) December 26, 2022
(file photo) pic.twitter.com/8Lsa809rpx