शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 06:41 IST

शेतकरी, कर्मचारी, कर्जदार यांच्यासह सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आले. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच दिवाळीची भेट नागरिकांना मिळणार असून सणाचा आनंद द्विगुणीत हाेणार आहे. 

नवी दिल्ली : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांचा ‘महागाई दिलासा’ही (डीआर) ३ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.

सध्या डीए व डीआर हे मूळ वेतन व पेन्शनच्या ५५ टक्के आहेत. त्यात ३ टक्के वाढ होईल. ती पूर्वलक्षी प्रभावाने १ जुलै २०२५ पासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १०,०८३.९६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.

 केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा डीए आणि डीआरमध्ये सुधारणा करते. या आधीची सुधारणा मार्चमध्ये झाली होती, तसेच तो बदल १ जानेवारीपासून लागू केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्याच महिन्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कामगिरीवर आधारित बोनसला मंजुरी दिली होती.

प्रवासी : एसटीची हंगामी १० टक्के भाडेवाढ रद्दमुंबई : राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीची दिवाळीतील १० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे. अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दरवाढ रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी हंगामात १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये १० टक्के भाडेवाढ लागू होणार होती. परंतु, आता प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. त्यामुळे नेहमीच्या दरानुसार दिवाळीत देखील प्रवाशांना एसटीचे तिकीट काढणे शक्य होणार आहे. 

गुंतवणूकदार : सोने १.२१ लाख रुपयांवर; चांदीही उच्चांकावर नवी दिल्ली : अमेरिकन सरकारचे ‘शटडाउन’ आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये बुधवारी मोठी उसळी आली. दिल्लीत सोन्याच्या दरात  १,१०० रुपयांनी वाढ झाल्याने ते प्रति १० ग्रॅम १.२१ लाख रुपयांच्या वर पोहोचले आहे. दरम्यान, चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. चांदी प्रतिकिलो १,५०,५०० रुपये (सर्व करांसह) या विक्रमी पातळीवर आहे. 

शेतकरी : गव्हाच्या एमएसपीत ६.५९% वाढ नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी २०२६-२७ या सालाकरिता गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत ६.५९ टक्के वाढ केली. या निर्णयाने गव्हाचा प्रतिक्विंटल दर १६० रुपये वाढून २,५८५ रुपये असा निश्चित झाला. २०२५-२६ या साली गव्हाचा प्रतिक्विंटल आधारभूत दर २,४२५ रुपये इतका होता.  गव्हाच्या किमतीव्यतिरिक्त करडई, मसूर, मोहरी, हरभरा, राई, बार्ली, अशा सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. करडईच्या प्रतिक्विंटल दरात ६०० रुपये, मसूरच्या प्रतिक्विंटल दरात ३०० रुपये, राई प्रतिक्विंटल दरात २५० रुपये, मोहरीच्या प्रतिक्विंटल दरात २५० रुपये, हरभऱ्याच्या प्रतिक्विंटल दरात २२५ रुपये व बार्लीच्या प्रतिक्विंटल दरात १७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.   

कर्जदार : रेपो दर जैसे थे; ५.५ टक्क्यांवर स्थिर राहणार मुंबई  : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, अमेरिकी टॅरिफच्या परिणामांवर लक्ष ठेवत दर कमी करण्याचा निर्णय पुढे घेता येईल. आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी वृद्धी दर अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.८% केला. किरकोळ महागाईचा अंदाज ३.१ टक्क्यांवरून २.६ टक्क्यांवर आणला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Central Government's Dussehra Gift: DA Hike for Employees, Pensioners Benefit

Web Summary : The central government has approved a 3% DA hike for employees and pensioners, effective July 1, 2025. Railway employees also received performance-based bonuses. Additionally, the government increased wheat MSP by 6.59%. The RBI kept the repo rate unchanged at 5.5%.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार