शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये ओबीसी, एससी-एसटीसह सवर्ण आरक्षण होणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 22:47 IST

जम्मू काश्मीरबद्दल मोदी सरकारचे दोन महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: देशभरात लागू असलेलं आरक्षण जम्मू-काश्मीरमध्येही लागू करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे या आरक्षणाचा लाभ पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनादेखील मिळणार आहे. याशिवाय 1954 च्या राष्ट्रपती आदेशात बदल करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. यामुळे कलम 370 शिथिल होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत जम्मू काश्मीरबद्दल दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं आल्याचं जेटलींनी सांगितलं. 

आज केंद्रीय कॅबिनेटनं 1954 च्या राष्ट्रपती आदेशात बदल केला. याच आदेशामुळे जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू आहे. राष्ट्रपती आदेशात बदल केल्यानं कलम 370 शिथिल झाल्याची माहिती जेटली यांनी दिली. याशिवाय राज्यपालांच्या स्वीकृतीनं जम्मू काश्मीरमध्ये आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमधील जनतेला ओबीसी, एससी-एसटीसह सवर्ण आरक्षणाचा लाभ मिळेल. हे आरक्षण आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतच्या जनतेसाठी लागू असेल, असं जेटली म्हणाले. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेलाही मिळणार आहे.केंद्रीय कॅबिनेटनं जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) अध्यादेश 2019 ला मंजरी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल. मोदी सरकारनं गेल्याच महिन्यात गेल्याच महिन्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे आरक्षणदेखील आता जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळेल.

टॅग्स :reservationआरक्षणSC STअनुसूचित जाती जमातीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटली