शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

budget 2022: शेती होणार हायटेक, ड्रोनचा शेतीसाठी वापर; रसायनविरहित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 06:14 IST

Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : रसायनमुक्त नैसर्गिक शेतीवर भर देतानाच ‘किसान ड्रोन’चा वापर करून, तसेच डिजीटल आणि अत्याधुनिक सेवांचा देशभरातील शेतीसाठी वापर करून शेतीला ‘हायटेक’ बनविण्यावर भर देण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.

रसायनमुक्त नैसर्गिक शेतीवर भर देतानाच ‘किसान ड्रोन’चा वापर करून, तसेच डिजीटल आणि अत्याधुनिक सेवांचा देशभरातील शेतीसाठी वापर करून शेतीला ‘हायटेक’ बनविण्यावर भर देण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. या अर्थसंकल्पात कृषीसाठी ४.५ टक्के वाढ करून १ लाख ३२ हजार ५१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मत्स्य, पशुसंवर्धन, दुग्धप्रक्रियेसाठी ६,४०७.३१ कोटी तर अन्नप्रक्रिया उद्योगासाठी २,९४१.९९ कोटींची तरतूद केली आहे. वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहू आणि भात (पॅडी)च्या किमान आधारभूत किंमत देण्यासाठी या अर्थसंकल्पात सन २०२२-२३ या वर्षासाठी २ लाख ३७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीतून १२०८ लाख टन धान्य खरेदी केले जाईल. त्याचा लाभ १६३ लाख शेतकऱ्यांना मिळेल. त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होईल. या अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. 

तेलबिया उत्पादनावर भर खाद्यतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्यात येईल. नैसर्गिक शेतीची योजना, गंगा किनाऱ्यावरील ५ किलोमीटर परिसरात पहिल्या टप्प्यात राबविली जाईल.

‘किसान ड्रोन’चा वापरशेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पिकांचा आढावा घेण्यात येईल. शेतीवर कीटकनाशके फवारण्यात येतील, जमिनीसंदर्भातील कागदपत्रांचे डिजिटाजेशन करण्यात येईल. याशिवाय नाबार्डच्या साह्याने ग्रामीण उद्योजक आणि कृषी स्टार्टअपसाठी अर्थसाह्य केले जाईल. 

कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेलकृषी क्षेत्रात खासगी आणि सरकारी सहभागातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. या सहभागाद्वारे २०२२-२३ या वर्षात देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सेवा पुरविल्या जातील. 

राकेश टिकैत, प्रवक्ते, भारतीय किसान युनियनयंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या काहीही फायद्याचा नाही. तो केवळ कागदोपत्री चांगला वाटतो. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खिशात काहीही पडणार नाही. एमएसपी कायद्यामुळे कमी किमतीत मालाची खरेदी बंद होईल, असे म्हटले होते. मात्र याचा फायदा व्यापाऱ्यांना होत असून ते कमी किमतीत मालाची खरेदी करून एमएसपीमध्ये अधिक किंमतीने विक्री करत आहेत.

राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनाकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी कृषी सुधारणांच्या नावाखाली स्वप्नांचा मनोरा बांधला असला तरी प्रत्यक्षात अर्थसंकल्पात काहीच नाही. ‘कृषी’मध्ये डिजिटल क्रांती करण्याची भाषा केली जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला कृषी महाविद्यालयांची अवस्था वाईट आहेे. तिथे एकही संशोधन होत नाही, मग डिजीटल क्रांती होणार कशी? केवळ सोशल मीडियावर गव्हाची शेती पिकवता येत नाही.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022agricultureशेतीFarmerशेतकरीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन