शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

Union Budget 2019: महिलांसाठी ‘इल्ले’, ‘नारी टु नारायणी’ असे कोरडे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 02:33 IST

हर घर जल’ ही घोषणाही डोक्यावरून पाण्याचे हंडे वहावे लागणा-या महिलांना आशेचा किरण दाखवणारी आहे.

देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्षेत्रात बरोबरीचा वाटा उचलणाऱ्या स्त्रिया ‘विकासाच्या भागीदार’ आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करणाºया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्षात मात्र सोने महाग करून, पेट्रोलवरचा अधिभार वाढवून ‘गृहिणीं’ची नाराजीच ओढवून घेतली आहे. गेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारच्या विकास योजनांमधून शहरी स्त्रियांचा मोठा गट दुर्लक्षित राहिला होता. याही वर्षी ती परिस्थिती बदललेली नाही. महिला-बाल कल्याणासाठीच्या सकल योजनांसाठीच्या एकत्रित तरतुदीचा आकडाही अर्थमंत्र्यांच्या भाषणातून गायब होता.‘गाव, गरीब आणि शेतकरी’ असा केंद्रबिंदू असलेल्या या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील गरिबांसाठी घरे, वीजजोडण्या, शौचालये, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन यावर भर आहे; त्याचा लाभ अंतिमत: महिलांना होईल. ‘हर घर जल’ ही घोषणाही डोक्यावरून पाण्याचे हंडे वहावे लागणा-या महिलांना आशेचा किरण दाखवणारी आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांना चालना देणे आणि बचत गटसदस्यांना सहजी भांडवलाची उपलब्धता या दोन महत्त्वाच्या तरतुदी! मात्र, गर्दीने बजबजलेल्या शहरांमध्ये सुरक्षित वाहतुकीपासून पाळणाघरासारख्या अत्यावश्यक सुविधांसाठी प्रतीक्षेत असलेल्या शहरी स्त्रियांना सुविधा देणे सोडाच; त्यांचा महिन्याचा घरखर्च वाढेल, अशीच बातमी निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढावा, याकरिताच्या उपाययोजना सुचवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा मात्र सीतारामन यांनी केली आहे.‘पक्षी एका पंखाने उडू शकत नाही,’ याचे भान देणाºया स्वामी विवेकानंदांचा उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात होता, हे विशेष!

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Womenमहिला