शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा; यात नेमक्या काय आहेत तरतुदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 09:32 IST

घटस्फोट आणि लिव्ह-इन रिलेशनशिप यासंबंधीच्या कायद्यांचा उल्लेख आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभेत बुधवारी समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. याआधी मंगळवारी विधानसभेत हे मांडण्यात आले होते. आता राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे स्वरूप येईल. अशाप्रकारे, उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरले. त्यात वारसाहक्क, विवाह, घटस्फोट आणि लिव्ह-इन रिलेशनशिप यासंबंधीच्या कायद्यांचा उल्लेख आहे.

लग्नाचे काय?

nविवाहासाठी तरुणाचे वय २१ वर्षांपेक्षा आणि मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. विवाहफक्त स्त्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतो.nपती किंवा पत्नी हयात असल्यास दुसरा विवाह पूर्णपणे प्रतिबंधित.nघटस्फोटानंतर स्त्रीला त्याच पुरुषाशी किंवा दुसऱ्या पुरुषाशी पुन्हा लग्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटींचे बंधन नाही. याचे उल्लंघन झाल्यास तीन वर्षे कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद.nविवाहित जोडप्यांपैकी कोणीही दुसऱ्याच्या संमतीशिवाय धर्म बदलल्यास, दुसऱ्याला घटस्फोट घेण्याचा आणि भरणपोषणाचा दावा करण्याचा पूर्ण अधिकार.nलग्नाची नोंदणी आता अनिवार्य. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आता ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा व राज्य स्तरावर त्यांची नोंदणी करणे शक्य. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक वेब पोर्टलदेखील उपलब्ध असेल.nस्त्री आणि पुरुष यांच्यातील विवाहाच्या धार्मिक/सामाजिक विधींत कायद्याचा हस्तक्षेप नाही. सप्तपदी, आशीर्वाद, निकाह, होली युनियन किंवा आनंद करुज किंवा अशा इतर परंपरांचा वापर करता येणार.

घटस्फोटाबद्दल काय म्हटले आहे?nन्यायालयातील प्रलंबित प्रकरणे लवकरच निकाली निघतील. मुस्लिम भगिनींची स्थिती सुधारेल त्यांनाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार.nसर्व धर्मांसाठी समान कायदे होतील. परंतु समान नागरी कायद्यात समाविष्ट केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त कोणत्याही धर्माच्या श्रद्धांशी छेडछाड नाही.nगुलामगिरी, देवदासी, हुंडा, तिहेरी तलाक, बालविवाह किंवा इतर प्रथा कायद्याने दूर होण्याची गॅरंटी.

लिव्ह इन रिलेशनशिपबाबत नियमnलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिकअसणे आवश्यक. लिव्ह-इनमध्ये राहण्यापूर्वीतिला ओळख पटवण्याच्या उद्देशाने नोंदणीकरणे आवश्यक. n२१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलगा आणि मुलीला या नोंदणीबद्दल त्यांच्या पालकांना माहिती देणे बंधनकारक.

वारसा हक्काचे काय?समान नागरी कायद्यात मृत व्यक्तीच्या मालमत्तेत पालकांना वाटा देण्याची तरतूद. मालमत्तेच्या अधिकारात मुलगा आणि मुलींना समान अधिकार. कायद्याच्या कलम ३ (१-अ) मध्ये कोणत्याही नातेसंबंधातून जन्माला आलेले मूल हे परिभाषित केले गेले आहे, तर दुसरीकडे कलम ४९ मध्ये कोणत्याही पद्धतीने जन्माला आलेल्या मुलांना मालमत्तेत समान हक्क देण्यात आला आहे.कलम ५५ अन्वये गर्भाला इतर मुलांप्रमाणे समान अधिकार प्रदान.संपत्तीसाठी पालकांचा खून करणाऱ्या मुलाचा वा मुलीचा मालमत्तेतील हक्क काढून घेतला. त्यामुळे संपत्तीसाठी असे खुनाचे गुन्हे कमी होतील.एखादी व्यक्ती स्वेच्छेने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मार्गाने मिळवलेली सर्व संपत्ती देऊ शकते आणि ती तिच्या हयातीत मृत्यूपत्र बदलू शकते किंवा त्याची इच्छा असल्यास मृत्यूपत्र परत घेऊ शकते.

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडUniform Civil Codeसमान नागरी कायदाmarriageलग्नDivorceघटस्फोट