शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'UPS मधील U म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न', नवीन पेन्शन योजनेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 16:49 IST

Mallikarjun Kharge On UPS: केंद्रीय कॅबिनेटने शनिवारी यूनिफाइड पेन्शन योजनेला (UPS) मंजुरी दिली आहे.

Unified Pension Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूनिफाइड पेन्शन स्कीम (Unified Pension Scheme) नावाची नवीन निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. 1 एप्रिल 2025 या योजनेची सुरुवात होईल. दरम्यान, आता या योजनेवरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी या योजनेवरुन नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली. 

मल्लिकार्जुन खरगे यांनी योजनेतील 'यू' म्हणजे मोदी सरकारचा 'यू-टर्न' असल्याचे म्हटले आहे. "4 जूननंतर पंतप्रधानांच्या सत्तेच्या अहंकारावर जनतेच्या शक्तीने मात केली. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांच्या उदयामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अलीकडेच आपल्या महत्त्वाच्या निर्णयांवरुन माघार घ्यायला सुरुवात केली आहे. आम्ही आमचे उत्तरदायित्व सुनिश्चित करत राहू आणि या निरंकुश सरकारपासून 140 कोटी भारतीयांचे संरक्षण करू." 

खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांचा उल्लेख केला. हे निर्णय विरोधकांच्या विरोधानंतर मागे घेण्यात आले आहेत. यामध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन/इंडेक्सेशनबाबत अर्थसंकल्पात घेतलेला निर्णय मागे घेणे, वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणे, प्रसारण विधेयकाचा मसुदा मागे घेणे आणि ब्युरोक्रसीमधील लॅटरल एंट्री रद्द करणे, या निर्णयांचा समावेश आहे. 

अमित शाहंनी केले पेन्शन योजनेचे कौतुक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या यूपीएसचे कौतुक केले. "आज केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूनिफाइड पेन्शन स्कीमला मंजुरी दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. या योजनेला मंजुरी देऊन मोदी सरकारने पेन्शनला चालना दिली आहे. देशाच्या कारभाराचा कणा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत," असे ते म्हणाले.

यूनिफाइड पेन्शन योजना काय आहे?केंद्रीय कॅबिनेटने शनिवारी यूनिफाइड पेन्शन योजनेला (UPS) मंजुरी दिली आहे. UPS अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना 12 महिन्यांच्या सरासरी पगारावर 50 टक्के ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना कमीत कमी 25 वर्ष सेवा करावी लागेल. यूनिफाइड पेन्शन योजनेतंर्गत जवळपास 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने ही योजना लागू केली तर त्या कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळेल. ज्या कर्मचाऱ्यांनी 10 वर्षांपर्यंत नोकरी केली आहे, अशांना 10 हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूदही यात आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर रक्कम कुटुंबाला दिली जाईल. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकारEmployeeकर्मचारी