दोन वर्षीय बालिकेचा इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: January 8, 2016 23:53 IST2016-01-08T23:20:44+5:302016-01-08T23:53:42+5:30
नाशिक : इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खेळताना अचानक तोल जाऊन खाली पडलेल्या दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़७) सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरात घडली़ मयत मुलीचे नाव गौरी राजू गरकळ (रा. उमंग साई अपार्टमेंट, पाथर्डी फाटा) असे आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गौरी महिल्या मजल्यावर खेळत असताना अचानक तिचा तोल गेला व ती जमिनीवर पडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गौरीस तिची आई कुसूम यांनी प्रथम खासगी व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)