अनैतिक संबंध, पत्नीचा निघृण खून

By Admin | Updated: May 12, 2014 20:56 IST2014-05-12T20:56:42+5:302014-05-12T20:56:42+5:30

अनैतिक संबंध; पत्नीचा निघृण खून

Unethical relationship, wife's mother's blood | अनैतिक संबंध, पत्नीचा निघृण खून

अनैतिक संबंध, पत्नीचा निघृण खून

ैतिक संबंध; पत्नीचा निघृण खून
* जयसिंगपुरातील घटना : संशयित कोल्हापूरचा, तर मृत कुरुंदवाडची
* संशयित स्वत:हून पोलिसांत हजर
जयसिंगपूर : अनैतिक संबंधाच्या कारणातून डोक्यात लोखंडी सळईचा वार करून पत्नीचा निघृण खून केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर शहरात उघडकीस आली. सुजाता ऊर्फ विजया संतोष सावंत (वय ३२, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. इंदिरानगर झोपडप˜ी, जयसिंगपूर) असे मृत महिलेचे नाव असून, संशयित आरोपी संतोष रामचंद्र सावंत (३५. रा. नाना पाटील नगर, कोल्हापूर) हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला. याबाबतची नोंद येथील पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, चौदा वर्षांपूर्वी सुजाता हिचा संतोष सावंत याच्याशी विवाह झाला होता. संतोष हा जेसीबी वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यांना ओंकार (१३), प्रणव (१०) अशी दोन मुले आहेत. चालकाचा व्यवसाय असल्याने संतोष नेहमी बाहेरगावी असायचा, दरम्यान कुरुंदवाडमधील व्यक्तीशी सुजाता हिचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही गोष्ट संतोषला समजली होती. त्यानंतर दोघांत या विषयावरून वाद होत होता. तसेच सहा महिन्यांपूर्वी सुजाता ही प्रियकरासोबत बेपत्ता झाल्याची तक्रार संतोषने कुरुंदवाड पोलिसांत दिली होती. या सर्व घटनेनंतर सुजाता व संतोष यांच्यात समेट झाला होता. तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील इंदिरानगर झोपडप˜ीमधील सोमनाथ जाधव यांच्या घरी तो भाड्याने राहायला आला होता. दरम्यान, काल (रविवार) रात्री संतोष व सुजाता यांच्यात अनैतिक संबंधावरून वाद झाला. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुजाता झोपली असताना संतोषाने चिडून लोखंडी सळीने डोक्यात वार करून तिचा खून केला.
आज सकाळी घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रकाश घारगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक गणेश लोकरे, शाम कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर दुपारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची फिर्याद सुजाताची आई मीना बळवंत ताबरे (४६, रा. झारी मशिदीच्या मागे, कुरुंदवाड)हिने दिली.
चौकट -
संशयित पोलिसांत हजर
डोक्यात वार केल्यानंतर सुजाता गंभीर जखमी झाली. मोठा रक्तस्राव झाल्याने ती मृतावस्थेत पडली. त्यानंतर पहाटे चार वाजता संतोष घरातून बाहेर पडला. प्रथम कुरुंदवाडला जाण्यासाठी बसस्थानकावर आला होता; मात्र कुरुंदवाडकडे बस नसल्याने त्याने कोल्हापूर गाठले. त्यानंतर सकाळी परत तो कुरुंदवाड पोलिसांत हजर होऊन पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. कुरुंदवाड पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी संशयिताला आणण्यात आले होते. त्याच्या चेहर्‍यावर कोणताही लवलेश नव्हता.
(प्रतिनिधी)
फोटो - १२०५२०१४-जेएवाय-०४

Web Title: Unethical relationship, wife's mother's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.