शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांनी आवाज बुलंद केल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 05:51 IST

हरीश गुप्ता  नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य ...

हरीश गुप्ता नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि अन्य भागांतील पक्षाचे नेते दबाव टाकत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थ शांतता आहे. हे आवाज पूर्वी पक्षात चार भिंतींच्या आत होते. मात्र, हा आवाज आता लोकांमध्ये मार्ग शोधत आहे. केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील एक खासदार अशा दोन प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली जावी, असे मत व्यक्त केले आहे. 

चार वेळा लोकसभेचे खासदार असलेले खासदार वरुण गांधी म्हणाले की, मुजफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकत्र झाले आहेत. ते आमच्या रक्तामासाच्या नात्याचे आहेत. संजीव बाल्यान यांनी सावध प्रतिक्रिया दिली. पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे की, मुस्लिम, अहीर, जाट आणि गुर्जर (एमजेजीएआर) यांची घातक आघाडी पुन्हा होऊ शकते. स्व. चौधरी चरण सिंह यांनी ७० च्या दशकात अशी आघाडी बनविली होती.

आंदोलक शेतकऱ्यांवरून व्यक्त होऊ लागले नेतेn    हरियाणातील भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी जाहीरपणे आंदोलक शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. पंजाबमध्येही अशीच भावना आहे. n    या राज्यात भाजपने शिरोमणी अकाली दलासारखा महत्त्वाचा सहकारी गमावला आहे. राजस्थानात भाजपला मोठा धक्का बसला असून सात वर्षांनंतर पंचायत समिती निवडणुकीत केवळ ५५० जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेसला ६७० जागा मिळाल्या आहेत. राजस्थानात वसुंधरा राजे समर्थक आणि विरोधक यांच्यात पक्ष विभागलेला आहे. n    पक्ष नेतृत्वाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना शेतकऱ्यांशी चर्चेसाठी मैदानात उतरविले होते. तर, सरकार शेतकऱ्यांबाबत नरम राहिले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी