शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्समध्ये दाखल, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:15 IST

Chhota Rajan : छोटा राजनला एम्समधील ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आहे, त्याठिकाणी दिल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

Chhota Rajan : नवी दिल्ली : तिहार तुरुंगात बंद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. छोटा राजनला शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छोटा राजनच्या नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान, छोटा राजनला एम्समधील ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आहे, त्याठिकाणी दिल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, छोटा राजनच्या नाकाची छोटी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर पोलीस डॉक्टरांचा सल्ला घेतील. त्यानंतर त्याला पुन्हा तिहार तुरुंगात नेले जाईल. छोटा राजनवर अनेक गुन्हे दाखल आहेत. २००१ मध्ये एका हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे अनेक शत्रू आहेत. त्यामुळे रुग्णालयात त्याची सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. कोणालाही त्याला भेटण्याची परवानगी नाही. फक्त डॉक्टरच त्याच्याशी उपचारांबद्दल चर्चा करू शकतात. वॉर्डच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात आहेत. सुरक्षेची कारणे लक्षात घेऊन छोटा राजन नेहमी पोलिसांच्या निगराणीखाली असतो.

इंडोनेशियामधून झाली होती अटकछोटा राजनला २०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईत त्याच्याविरोधात अनेक प्रकरणे होती, ती सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे. अटक होण्यापूर्वी छोटा राजन जवळजवळ तीन दशके फरार होता. छोटा राजन हा एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असल्याचे म्हटले जात होते. छोटा राजनविरुद्ध खंडणी, खून, तस्करी आणि ड्रग्जचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध ७० हून अधिक वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनAIIMS hospitalएम्स रुग्णालयjailतुरुंग