समजून घ्या ‘कोरोना’, फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 02:53 AM2020-06-13T02:53:58+5:302020-06-13T02:54:23+5:30

प्रतिबंधाच्या गोष्टी जितक्या साध्या, सोप्या आणि कमी ठेवल्या जातील तितक्या त्या अवलंबिल्या जाण्याची शक्यता जास्त असते

Understand ‘Corona’, is it necessary to use a face shield? | समजून घ्या ‘कोरोना’, फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का?

समजून घ्या ‘कोरोना’, फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का?

Next

सध्या अनेक जण फेस शिल्ड वापरावा की नाही, या संभ्रमात आहे. मास्कने नाक व तोंड झाकले, तरी डोळ्यांतून काही प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात, हा कोरोनाबाधित व्यक्ती ६ फुटांपेक्षा कमी अंतरात असेल व शिंकलाच व खोकला तरच होईल; पण यासाठी ज्यांना चष्मा आहे त्यांना फेस शिल्डची गरज नाही. जे चष्मा वापरत नाहीत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी नंबर नसलेला साधा चष्मा, गॉगल वापरला तरी चालेल. म्हणून सर्वांनी फेस शिल्ड वापरावाच असे काही नाही.

प्रतिबंधाच्या गोष्टी जितक्या साध्या, सोप्या आणि कमी ठेवल्या जातील तितक्या त्या अवलंबिल्या जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून उगीचच फेस शिल्डची त्यात भर घालण्याची गरज नाही. पण काही जण असे आहेत ज्यांना फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे व फेस शिल्डमुळे प्रतिबंधात भर पडू शकेल. डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी, बँक, पोस्ट आॅफिस, विमानतळ, दुकान जिथे लोक काउन्टरवर समोर येऊन बोलतात. पोलिसांचा कमी जागेत जास्त लोकांशी संपर्क येतो व सोशल डिस्टन्सिंग पाळणे अवघड आहे. अशी ठिकाणे - उदाहरणार्थ हवाईसुंदरी, विमानातील प्रवासी, धार्मिकस्थळे. तळागाळात अनेक जणांमध्ये जाऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, फिल्डवरून वार्तांकन करणारे पत्रकार, निवासी बिल्डिंग, कार्यलयाबाहेर दारावर उभे असणारे सुरक्षा कर्मचारी (सिक्युरिटी गार्ड). फक्त वरील काही मोजक्या व्यक्ती सोडून इतरांनी फेस शिल्ड वापरण्याची गरज नाही. वरील जे व्यक्ती फेस शिल्ड वापरतील त्यांनी दर चार ते सहा तासांनी तो आतून व बाहेरून नीट सॅनिटायजर स्प्रेमधून फेस शिल्डच्या दोन्ही बाजंूच्या काचांवर शिंपडून तो स्वच्छ निर्जंतुक कापसाने किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा. घरात फेस शिल्ड ठेवू तेव्हा तो लहान मुलांच्या हाती लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

- अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून,
वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरतआहेत.)

Web Title: Understand ‘Corona’, is it necessary to use a face shield?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.