शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

...तर मोदींचा वारासणीत धुव्वा उडेल- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 19:29 IST

राहुल गांधींचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद

सर्व विरोधक एकत्र आल्यास लोकसभा निवडणूक जिंकणे तर सोडाच, पंतप्रधान मोदींना त्यांची वाराणसीमधील जागादेखील राखता येणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. बंगळुरुत पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना राहुल यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला. '2019 ची लोकसभा निवडणूक जिंकणे तर दूरच राहिले, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आल्यास, पंतप्रधानांना वाराणसीची जागाही गमवावी लागेल,' असे राहुल म्हणाले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी तिसऱ्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली. 'खरे सांगायचे झाल्यास भाजप पुढील निवडणूक जिंकेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे 2019 मध्ये परिस्थिती सामान्य होईल, असे मला वाटते,' असे राहुल गांधी यांनी म्हटले. दलितांच्या वाढत्या आक्रोशाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे उत्तर दिले. 'दोन मुख्य मुद्द आहेत. विरोधी पक्षांची एकजूट एका विशिष्ट उंचीवर पोहोचली की त्यांना (भाजपला) निवडणूक जिंकणे अवघड होईल. सध्या विरोधी पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे,' असेही राहुल यांनी म्हटले. उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत असल्याकडे राहुल गांधींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अशा परिस्थितीत ते (भाजप) कुठून जागा जिंकणार? आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाबमध्ये आम्ही भाजपला पराभूत करु,' असे राहुल यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी सहाव्यांदा कर्नाटकच्या दौऱ्यावर आले आहेत. विरोधी पक्ष एकत्र येत असले तरी, या पक्षांच्या नेत्यांच्या मनात नेतृत्त्व करण्याची इच्छा आहे. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याबद्दलही राहुल गांधी यांना छेडण्यात आले. त्यावर बोलताना, आम्ही यातून निश्चित मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'आम्ही यावर तोडगा काढू. माणसांना कसे सांभाळून घ्यायचे, हे काँग्रेसला माहित आहे. आम्हाला कशाचाही अहंकार नाही. आम्ही लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही. त्यामुळे या परिस्थितीतून नक्कीच मार्ग काढला जाईल,' असे राहुल यांनी म्हटले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी