शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

मोदींच्या राजवटीत नागरिकांना कमी स्वातंत्र्य उरले; अमेरिकन संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 5:00 AM

फ्रीडम हाऊस संस्थेचा दावा; राजकीय, नागरी हक्कांवर गदा

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारतातील नागरिकांच्या राजकीय व नागरी हक्कांवर गदा आली आहे. त्यामुळे आता भारत नागरिकांना संपूर्ण नव्हे तर अंशत: स्वातंत्र्य देणारा देश बनला आहे असे फ्रीडम हाऊस या अमेरिकेतील संस्थेने यंदाच्या वर्षीच्या अहवालात म्हटले आहे. फ्रीडम हाऊस या संस्थेने असा दावा केला आहे की, भाजपचे हिंदुत्ववादी सरकार २०१४ साली सत्तेवर आल्यानंतर त्याचा न्यायालयीन यंत्रणेत हस्तक्षेप वाढत आहे. भारतामध्ये मुस्लिमांविरोधात होणारा हिंसाचार, पत्रकारांना धाकदपटशा दाखविणे हे प्रकार सध्या वाढीला लागले आहेत. जागतिक पातळीवर लोकशाही देशांचे नेतृत्व करण्याची भारताची क्षमता मोदी सरकारच्या कारकिर्दीत कमी झाली आहे. फ्रीडम हाऊसने म्हटले आहे की, कोरोना साथ सुरू झाल्यानंतर मोदी सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे असंख्य मजुरांना अक्षरश: पायी चालत आपले गाव गाठण्याची वेळ आली. या मजुरांचे प्रचंड हाल झाले. 

मोदींचे ‘एक्झाम वॉरिअर्स’ पुस्तकया महिन्यात येणारनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरिअर्स’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे, असे पेंग्विन रँडम हाउस इंडियाने शुक्रवारी जाहीर केले. या आवृत्तीत मोदी यांनी पालकांसाठी दिलेले मंत्र, मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयांबद्दलची जागरूकता, तंत्रज्ञान आणि वेळेच्या व्यवस्थापनाच्या  भूमिकेचा समावेश करण्यात आलेला आहे. या ताज्या आवृत्तीत महामारीचे परिणाम, निर्माण झालेले अडथळे आणि अनिश्चितता, नव्या पद्धतीने दैनंदिन जगण्यात अचानक करावा लागलेले बदल दिसतील, असे प्रकाशन संस्थेने निवेदनात म्हटले आहे.‘एक्झाम वॉरिअर्स’च्या नव्या आवृत्तीत काही नवे मंत्र समाविष्ट करण्यासाठी वेळ काढण्याची संधी मला महामारीने दिली. आता त्यात पालकांसाठी काही मंत्र आहेत तसेच विद्यार्थ्यांतील ‘एक्झाम वॉरिअर’ ला प्रेरित करील अशा अनेक गोष्टी नरेंद्र मोदी ॲपशी संबंधित आहेत,’ असे मोदी २८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले होते. नव्या आवृत्तीत विद्यार्थ्याला वर्गात आणि वर्गाबाहेर असणारी आव्हाने, स्वत:शीच त्याला करावी लागणारी स्पर्धा,  तंत्रज्ञान, कृतज्ञता आणि लक्ष्य निश्चित करणे याबाबत मार्गदर्शन असेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी