शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176% अन् शहीद जवानांच्या संख्येत 93% वाढ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:59 IST

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून मोदी आणि भाजपा सरकारविरुद्ध मोहिम राबविण्यात येत आहे. मोदी सरकारकडून पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकचे राजकारण केले जात असल्याचे सीपीएमने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला उघडं पाडण्याचं काम सीपीएम करेल, असा ठरावच सीपीएमच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या दहशतवादी घटनांची आकडेवारीच दिली आहे. 

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे. मात्र, भाजपाकडून या एकतेला तडा देण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी भाजपा या मतभेद निर्माण करत आहे. भारतीय विरुद्ध मुस्लीम आणि भारतीय विरुद्ध काश्मिरी, असा वाद पेटविण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. केंद्र सरकारच्या एका समितीच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ झाली आहे. तर नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्युच्या संख्येतही 93% वाढ झाली आहे. सन 2014 ते 2018 या कालावधीत प्रत्येक महिन्याला 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं या आकडेवारीवरुन समोर आल्याचं येचुरी यांनी सांगितलं आहे. 

तसेच काश्मिरी तरुणांचे दहशतवादी संघटनांकडे वळण्याचे प्रमाणही याच काळात वाढले आहे. सन 2013 मध्ये हे प्रमाण 16 असे होते, पण आता 2018 मध्ये हे प्रमाण 164 पर्यंत पोहोचले आहे. भाजपाकडून जाणीवपूर्वक कट्टर राष्ट्रवादाला खतपाणी घालण्यात येत असून गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील सन 2018-19 चा जीडीपी हा 7 टक्के असून गेल्या 5 वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी असल्याचेही येचुरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाMartyrशहीदSoldierसैनिक