गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी लंडनला निघालेले एअर इंडियाचे AI १७१ हे विमान कोसळले. या अपघातात विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून केवळ एकच व्यक्ती बचावली आहे. रमेश विश्वास असे या व्यक्तीचे नाव आहे. रमेश यांचा एक नवा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या भीषण अपघानंतरच्या आगीच्या ज्वाळांमधून आणि धुरांच्या लोटांमधून ते हातात मोबाईल घेऊन बाहेर आले होते.
सोशील मिडिआवर व्हायरल होत असलेल्या या १७ सेकेंदांच्या व्हिडिओमध्ये ते बाहेर येताना दिसत आहेत. रमेश विश्वास जेव्हा आगीतून बाहेर येत होते, तेव्हा सभोवताली एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू होती. एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन गॅगविक फ्लाइटमध्ये रमेश विश्वास हे ११ क्रमांकाच्या सीटवर बसले होते. या हल्ल्यात पायलट आणि क्रू मेंबर्ससह एकूण २४१ जणांचा मृत्यू झाला. यात २३० प्रवासी होते. यांपैकी केवळ रमेश विश्वास हेच जिवंत वाचू शकले.
पंतप्रधान मोदींनी घेतली होती भेट -या विमान अपघातानंतर, शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली होती. यावेळी अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वासकुमार याचीही भेट झाली होती. यावेळी रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेमके काय घडले? आपण कसे बचावलो यासंदर्भात माहिती दिली.
काय म्हणाले होते रमेश - दूरदर्शनसोबत बोलताना रमेश म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी मला अपघात कसा झाला? असे विचारले. त्यावर मी त्यांना घटनाक्रम सांगितला. ते सगळे माझ्या डोळ्यांसमोर झाले. मला स्वतःला विश्वास बसत नाहीये की, मी त्यातून जिवंत कसा बाहेर आलो. कारण थोड्यावेळासाठी माझाही मृत्यू होणार, असेच वाटत होते. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला समजले की मी जिवंत आहे. मी सीटबेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो. माझ्यासमोरच एअरहोस्टेसचा आणि बाकीच्या लोकांचे मृतदेह पडले होते."
दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर रिकामी जागा दिसली -"टेकऑफ नंतर विमानाचा वेग वाढवताच, काहीतरी विचित्र वाटले. अचानक ५-१० सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखे वाटले. नंतर अचानक विमानात हिरवे आणि पांढरे लाईट सुरु झाले. असे वाटत होते की जणू काही पायलटने उड्डाणासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मग ते थेट होस्टलच्या इमारतीत घुसले. विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर काही रिकामी जागा दिसली, म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला," असे विश्वासकुमारने सांगितले....तर माझ्यासोबतही काही वाईट घडले असते -"दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस, एक काका-काकू आणि सर्व काही जळत होते. या अपघातात माझा डावा हात गंभीरपणे भाजला. बाहेर येताच आग पसरत होती. जर काही सेकंद उशीर झाला असता तर कदाचित माझ्यासोबतही काही वाईट घडले असते," असेही विश्वासकुमारने यांनी म्हटले होते.