शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांसोबत लग्न न झाल्याने प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल; दोघांनीही एकसाथ संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:47 IST

उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात एका तरुणाचा आणि महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण व तरूणी दोघेही विवाहित असून दोघांनाही एक-एक मुलगा आहे. खरं तर ही महिला तिच्या माहेरी आली होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते पण कौटुंबिक दबावामुळे लग्न होऊ शकले नाही, असे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तरुणीचे किच्छा येथे तर तरुणाचे लग्न पिलीभीत येथे झाले होते. दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर त्यांना काळजी वाटू लागली. पहाटे दीडच्या सुमारास दोघेही आपापल्या घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रियकराने मुलीच्या भावाला फोन केला होता. त्यात तो म्हणाला की आम्ही दोघे खूप पुढे जात आहोत. त्यानंतर रात्रीच मुलीच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला मात्र दोघेही सापडले नाहीत. सकाळी गावातील झाडाला दोन मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

पोलिसांकडून अधिक तपास सुरू स्थानिक पुलभट्टा पोलीस ठाण्याचे प्रमुख कमलेश भट्ट यांनी सांगितले की, सकाळी साडेसहा वाजता गावकऱ्यांनी त्यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलीस दोन्ही कुटुंबांची चौकशी करत आहेत. दोघांचे कॉल डिटेल्सही काढले जात आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यूPoliceपोलिस