शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:43 IST

Supreme Court News: राजधानी दिल्लीमध्ये २०२० मध्ये झालेल्या दंग्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात असलेले विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये २०२० मध्ये झालेल्या दंग्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात असलेले विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. या दोघांविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. तर या प्रकरणातील इतर पाच आरोपांनी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

सध्या तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि शरजिल इमामच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती  अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सुनावणीस सुरुवात होण्यापूर्वीच पाच वर्षांहून अधिक काळ आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आल्याच्या मुद्द्याला आधार बनवत बचाव पक्षाने उमर खालिद आणि शरजिल इमाम यांना जामीन देण्याची मागणी केली. मात्र राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेवर विचार करणे या बाबी आरोपींना दीर्घकाळापासून तुरुंगात ठेवण्याच्या मुद्द्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

तसेच सुनावणीस उशीर झाल्याचा मुद्दा अधोरेखित करून जामीन मागता येणार नाही. तसेच एखाद्या खटल्यात प्रत्येक आरोपीच्या भूमिकेचं वेगवेगळं मूल्यांकन करणं आवश्यक आहे. सर्व आरोपींना एकच निकष लावणे न्यायसंगत ठरणार नाही. एखाद्या खटल्यात काही आरोपींची केंद्रीय भूमिका असते. तर काहींची भूमिका केवळ मदत करण्यापुरती असते. या दोघांमध्ये फरक केल्याशिवाय निर्णय देणे हे मनमानी केल्यासारखे होईल. प्रस्तुत खटल्यामध्ये उमर खालिद आणि शरजिल इमाम यांची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगली आणि अधिक गंभीर असल्याचे दिसत आहे, असं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Umar Khalid, Sharjeel Imam remain in jail; bail denied by SC.

Web Summary : Umar Khalid and Sharjeel Imam's bail plea rejected by Supreme Court due to evidence. Other accused in Delhi riots case granted bail. Court emphasizes the seriousness of their role in the 2020 Delhi riots.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhi violenceदिल्लीUmar Khalidउमर खालिद