शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

उमा भारती लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, 'हे' आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 13:52 IST

भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. 2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देभाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे.2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून तिर्थयात्रेला जाण्यासाठी उमा भारती निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. 

नवी दिल्ली - भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. 2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून तिर्थयात्रेला जाण्यासाठी उमा भारती निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे.  मात्र आता त्यांनीच लोकसभा 2019 निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केले आहे. 

'मी 2016 मध्येच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे. जर मी निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. मी माझा मतदारसंघ कधीही बदलू शकत नाही. तेथील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानत आहेत' असं उमा भारती यांनी म्हटले आहे. तसेच पुढे दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमा भारती यांनी '2024 मध्ये निवडणूक लढवेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शानदार बहूमत मिळवेन' असं म्हटलं आहे. आगामी निवडणूका न लढवण्याची माहिती भाजपा महासचिव रामलाल यांना दिली होती. रामलाल यांनी उमा भारतींना तीर्थयात्रेसाठी जाण्याआधी पक्षासाठी प्रचार करण्याबाबत सांगितले होते. 'पक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी 5 मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार आहे' असं उमा भारती यांनी सांगितलं आहे.   

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक