उमा भारती-शंकराचार्य यांच्यात जुंपली
By Admin | Updated: June 30, 2014 02:15 IST2014-06-30T02:15:24+5:302014-06-30T02:15:24+5:30
शिर्डीचे साईबाबा यांच्या पूजेवरून वाद वाढत चालला आहे. या मुद्यांवरून केंद्रीय मंत्री उमा भारती आणि शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्यात जुंपली आहे.

उमा भारती-शंकराचार्य यांच्यात जुंपली
>हरिद्वार : शिर्डीचे साईबाबा यांच्या पूजेवरून वाद वाढत चालला आहे. या मुद्यांवरून केंद्रीय मंत्री उमा भारती आणि शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्यात जुंपली आहे.
उमा भारती यांच्या वक्तव्यावर नाराज झालेल्या शंकराचार्यानी हरिद्वार येथील आपल्या आश्रमात साधू-संतांची बैठक बोलावली. यामध्ये साईबाबा यांची पूजेवर विचारविनियम झाला. त्यानुसार साईबाबांच्या पूजेला पाठिंबा देणा:या केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याविरुद्ध निंदा प्रस्ताव संमत होण्याची शक्यता असल्याचे सूत्रंनी सांगितले. या बैठकीत गंगा हा मुद्दा देखील चर्चेत होता. साईबाबांच्या पूजा करणो योग्य असल्याचे म्हणणा:या उभा भारती यांच्यावर शनिवारी शंकराचार्य स्वरुपानंद यांनी जोरदार टीका केली होती.
उमा भारती साईबाबांची पूजा करण्याचे समर्थन करून दबावाचे राजकारण करीत आहेत. उभा भारती राम भक्त नाहीत. त्या साईबाबांची पूजा करतात. त्या अयशस्वी होण्याचे हेच कारण आहे, आणि त्या मंत्री आहेत, भगवान नाहीत, त्यामुळे त्यांनी धार्मिक व्यवस्थेत दखल देऊ नये, असेही ते म्हणाले होते.
त्यांनी उमा भारती यांच्या गुरुभक्तीवर प्रश्नचिन्ह लावला आहे. उमा भारती यांनी गुरु स्वामी विश्वेश तीर्थ यांच्याकडून संन्सासची दीक्षा घेतली आहे. उमा भारतीचे गुरु साईबाबांच्या पूजेला विरोध करीत आहेत. मग संन्यासिनी उमा भारती गुरु विरुद्ध कशा काय जात आहेत, असा सवाल स्वामी स्वरुपानंद यांनी केला. (वृत्तसंस्था)