शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"हा फालतूपणा बघू नको"; राजा रघुवंशीचे रील्स पाहणाऱ्या तरुणीवर बसमध्ये ओरडली होती सोनम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:20 IST

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी उजाला यादवने सोनमसोबत बस प्रवास केल्याची माहिती दिली.

Raja Raghuvanshi Murder Case: इंदौरच्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली आहे. सोनम रघुवंशीने मेघालयात हनिमून दरम्यान तिचा प्रियकर राज कुशवाह आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पती राजाची हत्या केली. ज्या प्रकार सोनमने संपूर्ण कट रचून पतीला संपवले ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सध्या सोनम, तिचा प्रियकर राज आणि इतर मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत. अशातच गाझीपूरमधल्या उजाला यादव नावाच्या तरुणीने आपण सोनमसोबत प्रवास केला होता असा खुलासा केला. या प्रवासादरम्यान सोनम विचित्रपणे वागत होती असं उजाला यादवने म्हटलं.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात गाझीपूरच्या उजाला यादवने मोठा खुलासा केला. राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी पत्नी सोनम रघुवंशी ८ जूनच्या रात्री वाराणसी कॅन्ट स्टेशनवर होती, असा दावा उजाला यादवने केला. त्यावेळी उजालाला सोनमची पार्श्वभूमी किंवा राजा हत्या प्रकरणाशी तिचा कथित संबंध याबद्दल काहीच माहिती नव्हती. प्रवासादरम्यान दोघांमध्ये सामान्य बोलणं झालं ज्यामध्ये सोनमने गोरखपूरच्या माहिती मागितली, असं उजालाने माध्यमांशी बोलताना सांगितले.

उजालाच्या म्हणण्यानुसार, ८ जून रोजी ती वाराणसी कॅन्ट स्टेशनवर ट्रेनमधून उतरली तेव्हा अचानक एक तरुणी तिच्या जवळ आली आणि गोरखपूरला जाणाऱ्या बसबद्दल विचारू लागली. उजालाने तरुणीला सांगितले की येथून १०० मीटर अंतरावर एक बस स्टँड आहे तिथून तुला गोरखपूरला जाण्यासाठी बस मिळेल. उजालालाही घरी यायचे होते. म्हणून ती गाजीपूरमार्गे गोरखपूरला जाणाऱ्या कॅन्ट रोडवेजच्या बसमध्ये चढली. १० मिनिटांनी स्टेशनवर भेटलेली तरुणीही बसमध्ये आली आणि दुसऱ्या सीटवर बसली. यादरम्यान ती सारखी गोरखपूरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल असे विचारत होती. ती तरुणी वारंवार बसमधील लोकांकडून फोन मागत होती पण कोणीही तिला फोन दिला नाही. त्यानंतर ती सैदपूर येथे उतरली. ती तरुणी बसमध्ये आली तेव्हा तिच्यासोबत दोन मुलेही होती. रात्री ११ वाजता बस सुरू झाली तेव्हा दोघेही खाली उतरले, असं उजाला यादवने सांगितले.

उजालाने सांगितले की ती राजा रघुवंशीच्या हत्येशी संबंधित रील्स पाहत होती. तेव्हा सोनम तिच्यावर रागावली आणि म्हणाली की काय फालतू व्हिडिओ पाहतेय, ते पाहू नको. तिने आक्षेप घेतल्यानंतर मी ते बंद केले. यावेळी सोनमने आजूबाजूच्या लोकांकडून मोबाईल फोनही मागितले. पण कोणीही तिला फोन दिला नाही. सोनमने उजालाकडेही मोबाईल फोन मागितला होता. त्यानंतर तिने एक नंबर टाइप केला पण तो डायल केला नाही आणि लगेच डिलीट केला. त्यानंतर तिने मोबाईल परत उजालाला दिला. मला तो प्रकार थोडासा विचित्र वाटला असंही उजालाने म्हटलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उजालाने सोनमला टीव्हीवर पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की हीच तरुणी आपल्याला रात्री भेटली होती. उजालाने पोलिसांनाही याबद्दल माहिती दिली होती. तिने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या राजा आणि सोनमच्या लग्नाच्या कार्डच्या फोटोवरून नंबर घेतला आणि राजाच्या भावाला याची माहिती दिली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस