यूजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:20 IST2025-01-14T09:20:24+5:302025-01-14T09:20:44+5:30
पीएचडी, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळविण्यासाठी आणि सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीकरिता यूजीसी-नेट परीक्षा घेण्यात येते.

यूजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत निर्णय
नवी दिल्ली : यूजीसी- नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट) ही बुधवारी १५ जानेवारीला होणारी परीक्षा मकर संक्रांत व पोंगल या सणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सोमवारी केली.
पीएचडी, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळविण्यासाठी आणि सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीकरिता यूजीसी-नेट परीक्षा घेण्यात येते. ८५ विषयांसाठी संगणकाधारित पद्धतीने ही परीक्षा ३ जानेवारीपासून घेेण्यास सुरुवात झाली व ही प्रक्रिया १६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
मात्र, १५ जानेवारीला होणारी परीक्षा मकर संक्रांती व पोंगल या सणांमुळे पुढे ढकलावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन यूजीसी-नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली.