शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून उद्धव ठाकरे कुमारस्वामींच्या शपथविधीला अनुपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 12:27 IST

जेडीएसचे नेते कुमारस्वामी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील

मुंबई: जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा शपथविधी आज संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिलं आहे. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यानं उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला जाणार नाहीत. जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख यांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेगौडा यांचं अभिनंदन केलं. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असल्यानं आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकत नसल्याचं उद्धव यांनी देवेगौडा यांना सांगितलं. याबद्दल त्यांनी देवेगौडा यांच्याकडे दिलगिरीदेखील व्यक्त केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल भाष्य करत देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या. 'उद्धव ठाकरे सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे निमंत्रण असूनही ते शपथविधी सोहळ्याला जाऊ शकणार नाहीत. मात्र त्यांनी देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्या आहेत,' असं राऊत म्हणाले. एच. डी. देवेगौडा यांच्या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून एकी दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार आहे. या कार्यक्रमाला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८BJPभाजपाShiv Senaशिवसेनाkumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण