शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे यांनीही गुवाहाटीत यावं अन्...", आसामच्या मुख्यमंत्र्यांनी डिवचलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 17:39 IST

Assam CM : उद्धव ठाकरे यांनाही गुवाहाटीत यावे, असे सांगत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी डिवचले आहे. 

नवी दिल्ली : आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यातच आता उद्धव ठाकरे यांनाही गुवाहाटीत यावे, असे सांगत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी डिवचले आहे. 

एकनाथ शिंदे गटाच्या सर्व महत्वाच्या बैठका आणि महत्वाचे निर्णय गुवाहाटीमधून घेतले जात आहेत. त्यामुळे आसाममध्ये एकीकडे पुरस्थिती असताना सर्वांचे लक्ष गुवाहाटीतील एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांकडे आहे. याविरोधात गुरूवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोर आंदोलन केले. तसेच, महाराष्ट्रातील आमदारानी परत जावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, याला आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

आसामध्ये येण्यापासून मी कुणालाही रोखू शकत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये बुकिंग केले तर मी तुम्हाला येऊ नका, असे कसे सांगू शकतो. देशात सर्वत्र फिरण्याचा, राहण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले. तसेच, मी देशातील सर्व आमदारांना आसाममध्ये येण्याचे निमंत्रण देतो. महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होईल, माहीत नाही. पण ते (आमदार) जितके दिवस राहतील, तितके दिवस माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांनाही सुट्टीसाठी यावे, असेही हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

आमदारांची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे -भूपेन कुमार बोराह या सर्व घडोमोडीत आता आसाम कॉंग्रेसचे प्रमख भूपेन कुमार बोराह यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहीत लवकरात लवकर आसाम सोडण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या हितासाठी आसाम कॉंग्रेसने एकनाथ शिंदेंना आसाम सोडण्याचे आवाहन केले आहे. आसाममधील लोक नैतिकतेला महत्त्व देतात. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसह गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे, असे बोरा यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAssamआसामMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण