शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
6
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
7
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
8
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
9
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
10
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
11
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
12
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
13
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
14
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
15
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
16
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
18
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; आरोपी 3 मुलांचा बाप!
19
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
20
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, कर्नाटक राज्याची प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडली; प्रवाशांना फटका, कारण काय..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:21 IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी जनतेची माफी मागावी, अन्यथा..

कोल्हापूर : बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय, दडपशाहीचे कर्नाटक सरकारने धोरण राबविल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेने सोमवारी कर्नाटकची प्रवासी वाहतूक रोखली. त्यांच्या बसवर जय महाराष्ट्र असा फलक लावून कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनानेमहाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्याची वाहतूक व्यवस्था कोलमडली. त्याचा प्रवाशांना फटका बसला.उद्धवसेनेतर्फे मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी अकरा वाजता कर्नाटक सरकारच्या विरोधात निदर्शने केली. बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या कर्नाटकच्या बस रोखून त्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्या बसवर 'जय महाराष्ट्र' असा फलक लावून कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी जनतेची माफी मागावी, अन्यथा उद्या कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांना अधिवेशन काळात महाराष्ट्रात फिरकू देणार नाही, असा इशारा दिला. तसेच विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी कर्नाटकची बस वाहतूक बंद करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल.उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांचेही भाषण झाले. यावेळी अवधूत साळोखे, मंजीत माने, चंद्रकांत भोसले, अनिकेत घोटणे, दिनमहमंद शेख, संजय जाधव, संतोष रेडेकर, पंपू कोंडेकर, गोविंद वाघमारे आदी सहभागी झाले .

कर्नाटकची वाहतूक कोलमडलीआंतरराज्य करारानुसार कर्नाटकच्या १०० हून अधिक बसेस महाराष्ट्रात येतात. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून निपाणी, संकेश्वर, हत्तरगी, बेळगाव, सौंदत्ती यासह सीमाभागातील वाहतूक कोलमडली. रात्री उशिरापर्यंत ही वाहतूक सुरू नव्हती.महाराष्ट्राचीही वाहतूक बंदमहाराष्ट्राच्या एसटीही कोगनोळी टोल नाक्यापर्यंत धावल्या. दिवसभरात महाराष्ट्रातून कर्नाटक आणि सीमाभागात ५० हून अधिक बसेस धावतात. आंदोलनामुळे सीमाभागात अंतर्गत मार्गाने वाहतूक सुरु राहिली. मात्र राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाक्याच्या पर्यंत महाराष्ट्राच्या एसटी धावल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra, Karnataka transport disrupted by protests; passengers affected, read why.

Web Summary : Uddhav Sena's protest against Karnataka's actions disrupted Maharashtra-Karnataka transport. Buses were stopped, impacting passengers. The protest stemmed from alleged injustice towards Marathi speakers in border areas, leading to halted bus services on both sides.