शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'आधी आपल्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखा', भाजप नेत्याचे उदयनिधी स्टॅलिनला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 17:53 IST

'सनातन हजारो वर्षांपासून अस्तित्वात, मुघल, ईस्ट इंडिया कंपनी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकही सनातनाला हात लावू शकले नाहीत.'

Udaynidhi Stalin on Sanatan remarks: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद सुरू झाला आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष अन्नामलाई यांनी त्यांना आव्हान दिले. ते म्हणाले, मी उदयनिधी स्टॅलिन यांना आव्हान देतो की, त्यांनी आधी स्वतःच्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखावे.

सनातन हजारो वर्षांपासून...उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य बालिश असल्याचे सांगत अण्णामलाई म्हणाले, उदयनिधी हे त्यांचे वडील आणि आजोबांमुळेच या पदावर आहेत. सनातन धर्म वर्षानुवर्षे चालत आलेला आहे आणि यापुढेरी राहील. मुघल, ईस्ट इंडिया कंपनी आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकही सनातनाला हात लावू शकले नाहीत, मग तो कोण कुठला आला.

सर्व मर्यादा ओलांडल्याअन्नमलाई पुढे म्हणाले, ते सत्तेत आहेत, म्हणून त्यांना वाटते की, ते खूप शक्तीशाली आहेत. यामुळेच त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. उदयनिधींच्या वक्तव्यावेळी मंदिर प्रशासन मंत्रीदेखील मंचावर उपस्थित होते याचाच अर्थ ते मंदिरं आणि लोकांच्या धार्मिक प्रथा नष्ट करणार आहे. यावरुन त्यांची हिंदुविरोधी मानसिकता दिसून येते. उदयनिधींना आव्हान देतो की, त्यांनी आधी त्यांच्या आईला मंदिरात जाण्यापासून रोखावे.

राहुल गांधींसारखे शौर्य दाखवण्याचा प्रयत्न अन्नमलाई पुढे म्हणाले, उदयनिधी हे राहुल गांधींसारखे धाडसी दिसण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात त्यांचेच सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्याविरोधात पोलिसांना कोणतीही तक्रार करणार नाही. राज्यातून द्रमुकचा नायनाट होण्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. सध्याच्या पिढीला ते मान्य नाही, लोक आता द्रमुकला नाकारणार आहेत.

निवडणुकीत डीएमकेला स्वीकारणार नाहीलोकांना अशी भाषा मान्य नाही. सनातन धर्म सर्वांना एकत्र आणतो, हेच या धर्माचे सौंदर्य आहे. द्रमुक हा पूर्णपणे हिंदूविरोधी आणि तुष्टीकरणावर आधारित पक्ष आहे. या वक्तव्यावर संपूर्ण भारतातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. येत्या निवडणुकीत देश आणि तामिळनाडूची जनता द्रमुकला स्वीकारणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमHinduहिंदूBJPभाजपाcongressकाँग्रेस