शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग क्षेत्रात वाढले फसवणुकीचे प्रकार! ८९ टक्के कंपन्यांचा अनुभव : सायबर सुरक्षा ही चिंतेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 04:22 IST

भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.

नवी दिल्ली : भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.‘क्रॉल अ‍ॅन्युअल ग्लोबल फ्रॉड अ‍ॅण्ड रिस्क’ या अहवालात ही माहिती देण्यात आली. यानुसार, भारतातील फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात आयपी चो-या, पायरसी व बनवेगिरी ३६ टक्के आणि भ्रष्टाचार व लाच याचे प्रमाण ३१ टक्के आहे. गेल्या १२ महिन्यांतील घटनांच्या विश्लेषणानुसार, ४५ टक्के उत्तरदात्यांनी त्यांच्या फसवणुकीला भागीदार जबाबदार असल्याचे सांगितले.गेल्या वर्षी विद्यमान व माजी कर्मचारीच फसवणुकीतील प्रामुख्याने आरोपी होते. यंदा कनिष्ठ कर्मचारी अशा घटनांतील आरोपींमध्ये दुसºया स्थानी आहेत. ४३ टक्के प्रकरणात कनिष्ठ कर्मचारी आरोपी असल्याचे समोर आले आहे. फसवणूक व घोटाळ्यांचा फटका बसलेल्यांची संख्या २0१७ मध्ये २१ टक्क्यांनी वाढून ८९ टक्क्यांवर गेली आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण ८४ टक्के आहे. याचाच अर्थ भारतात फसवणुकीचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक म्हणजे सर्वाधिक आहे, असे क्रॉलच्या दक्षिण आशियाच्या व्यवस्थापकीय संचालक रेशमी खुराणा यांनी सांगितले.फसवणुकीमुळे आपल्या कंपनीला एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला, असे अनेक अधिकाºयांनी सांगितले. फसवणुकीमुळे एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसलेल्या देशांत मेक्सिको अव्वलस्थानी आहे. तेथील ३९ टक्के अधिका-यांनी अशी तक्रार केली.सायबर हल्ल्यामुळे बेजार-सायबर सुरक्षा हा चिंतेचा मुद्दा आहे. गेल्या १२ महिन्यांत सायबर हल्ला झाल्याचे त्यांनी मान्य केले. २0१६मध्ये हे प्रमाण ७३ टक्के होते, ते २0१७ साली ६४ टक्के झाले आहे. याचाच अर्थ यंदा त्यात ११ टक्के वाढ झाली आहे. फसवणूक, सायबर व सुरक्षा जोखीम यात वाढ झाल्याचे उत्तरदात्यांनी मान्य केले.