दुचाकी चोराला अटक

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:14+5:302015-02-14T23:50:14+5:30

पणजी : गोव्यात मोटरसायकल चोरणार्‍या एका आसामी इसमाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची मोटरसायकलही जप्त केली.

Two wheeler stole | दुचाकी चोराला अटक

दुचाकी चोराला अटक

जी : गोव्यात मोटरसायकल चोरणार्‍या एका आसामी इसमाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची मोटरसायकलही जप्त केली.
या इसमाचे नाव दुर्गेश शर्मा असे (२९) असून तो मूळचा आसाममधील आहे. गेली १२ वर्षे आपण गोव्यात राहात असल्याचा दावा तो करीत आहे. तो चालवित असलेल्या मोटरसायकलचा क्रमांक बोगस असल्याचा पोलिसांना संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे वाहनाचीही कागदपत्रे सापडली नाहीत आणि त्याच्याजवळचे ड्रायव्हिंग लायसनही बोगस असल्याचे आढळून आले. नागालँडमधील लायसन असल्याचे त्यावर लिहिले आहे; परंतु त्यावरील मजकूरावरून हे लायसन त्यानेच बनविले असल्याचे उघड झाले आहे. सीआयडीच्या घरफोडीविरोधी पथकाचे निरीक्षक संदेश चोडणकर या प्रकरणात तपास करीत आहेत.

Web Title: Two wheeler stole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.