दोन हजारांचा गांजा पकडला
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:09+5:302014-12-20T22:27:09+5:30
अहमदनगर : शहरातील आशा टॉकीज् चौकात बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या गेटमध्ये गांजा विक्री करताना कोतवाली पोलिसांनी एकास पकडले. रजाक अब्दूल सौदागर असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याकडे दोन हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला.

दोन हजारांचा गांजा पकडला
अ मदनगर : शहरातील आशा टॉकीज् चौकात बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या गेटमध्ये गांजा विक्री करताना कोतवाली पोलिसांनी एकास पकडले. रजाक अब्दूल सौदागर असे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याकडे दोन हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला.याबाबत कोतवाली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आशा टॉकीज् चौकात मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या गेटमध्ये रजाक सौदागर गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या कारवाईत सौदागर याच्याकडे ६०० ग्रॅम गांजा आढळून आला आहे. त्याची किंमत दोन हजार रुपये आहे. सौदागर याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अप्पर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ही गांजा विक्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या भिंती शेजारीच सुरू होती. ........................