शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 20:27 IST

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडणाऱ्या सुरक्षा दलांनी सोमवारी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत अजून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडणाऱ्या सुरक्षा दलांनी सोमवारी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत अजून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान या चकमकीत पोलिसांचा एक जवान जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. त्यानंतर सावध असलेल्या पोलिसांनी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर दिले. तसेच शोधमोहिम सुरू केली. त्याचदरम्यान उडालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.  या चकमकीमध्ये पोलिसांचा एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येविषयी माहिती मिळालेली नाही.  

दरम्यान, लष्कराने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा पुतण्या तल्हा राशिद याला गेल्या आठवड्यात ठार मारले होते. गेल्या आठवड्यात दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अग्लर कंदी गावात लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये तीन दहशतवादी ठार झाले. त्यामध्ये तल्हा राशिदही होता. 

गावातील दोन घरांमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने त्या परिसराला वेढा घातला व कारवाई सुरु केली. या कारवाई दरम्यान एक जवानही शहीद झाला. 44 राष्ट्रीय रायफल्स आणि 182 केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली होती.  या वर्षात दक्षिण काश्मीरमध्ये आतापर्यंत 72 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामध्ये दहा जैशचे दहशतवादी आहेत. दशकभरात प्रथमच इतक्य मोठया संख्येने दहशतवाद्यांना संपवण्यात आले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद