काश्मिर हंडवारामध्ये चकमकीत दोन अतिरेकी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 10:03 IST2016-03-18T10:03:22+5:302016-03-18T10:03:22+5:30
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंडवारामध्ये सुरु असलेल्या चकमकीत शुक्रवारी सुरक्षापथकांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

काश्मिर हंडवारामध्ये चकमकीत दोन अतिरेकी ठार
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १८ - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंडवारामध्ये सुरु असलेल्या चकमकीत शुक्रवारी सुरक्षापथकांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. चकमक अजूनही सुरु आहे.
प्राथमिक माहितीनुसार हंडवारामध्ये दोन ते चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोध मोहिम सुरु केली. त्यावेळी लपून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रत्युतरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले.
अजूनही काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. सुरक्षापथकांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. १० मार्चला पुलावामामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.