शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 19:18 IST

Encounter : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देकनिगाम या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती शुक्रवारी जवानांना मिळाली होती. त्यामुळे जवानांकडून परिसर घेरण्यात आला आणि शोधमोहीम सुरू झाली.

दक्षिण काश्मीर भागातील शोपियान जिल्ह्यात शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशवतवाद्यांना कंठस्नान घातले. तर दोन जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात चकमक सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे.

कनिगाम या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती शुक्रवारी जवानांना मिळाली होती. त्यामुळे जवानांकडून परिसर घेरण्यात आला आणि शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, जवानांनी परिसर वेढल्याचे समजताच लपलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरू झाल्याने दोघांत चकमक सुरू झाली. शुक्रवारी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळ काढू नये म्हणून जवानांकडून परिसरात फ्लड लाईट्स देखील लावले गेले. रात्री चकमक सुरूच होती. त्यादरम्यान आज दुपारपर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरFiringगोळीबारSoldierसैनिकDeathमृत्यू