जम्मू-काश्मीरमधून दोन दहशतवाद्यांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:13 IST2025-08-31T16:13:07+5:302025-08-31T16:13:22+5:30
वेळीच सुरक्षा यंत्रणांना दोघांना अटक केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जम्मू-काश्मीरमधून दोन दहशतवाद्यांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त
Jammu Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीदरम्यान तारिक शेख आणि रियाझ अहमद यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन असॉल्ट रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तारिक शेखच्या घरावर छापा टाकला अन् रिजाझ अहमदसह त्याला अटक केली. तसेच, जालियन गावात असलेल्या त्याच्या भाड्याच्या घरातून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
हे दोघेही या शस्त्रांच्या मदतीने राज्यात मोठ घटना घडवण्याच्या तयारीत होते. मात्र, वेळीच सुरक्षा यंत्रणांना दोघांना अटक केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.