दोन सुरक्षारक्षकांची हत्या, सीसीटीव्हीच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:28 AM2018-09-22T05:28:50+5:302018-09-22T05:28:52+5:30

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत लूट करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या केल्याची खळबळजनक घटना नॉयडात घडली.

Two security guards killed, CCTV disappeared | दोन सुरक्षारक्षकांची हत्या, सीसीटीव्हीच गायब

दोन सुरक्षारक्षकांची हत्या, सीसीटीव्हीच गायब

Next

नॉयडा : येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत लूट करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या केल्याची खळबळजनक घटना नॉयडात घडली. पोलीस अधीक्षक डॉ. अजय पाल यांनी सांगितले की, सी १३ सेक्टर एकमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे भवन आहे. याच ठिकाणी डीजीएम कार्यालय, स्टेशनरीचे गोदाम व सेक्टर एकची पीएनबीची बँक शाखा आहे. घटनास्थळाजवळ २० मीटर अंतरावर भारत सरकारचे टाकसाळ आहे.
पीएनबीच्या या शाखेत मुकेश यादव व मुद्रिका प्रसाद हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. मुकेश यादव उत्तर प्रदेशच्या मैनपुरी भागातील तर, मुद्रिका प्रसाद बिहारच्या आरा येथील रहिवासी होते.
>नगदी किंवा अन्य वस्तूंची चोरी झालेली नाही. पोलिसांनी सांगितले की, बँकेतील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर चोरटे घेऊन गेले. तपासासाठी घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलविण्यात आले आहे.

Web Title: Two security guards killed, CCTV disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.