तरुणाला लुटणारे दोघे दरोडा पथकाकडून जेरबंद

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30

पुणे : तरुणाला मोबाईलवर संपर्क साधत बोलावून घेत मारहाण करुन लुटणा-या दोघाजणांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कात्रज येथे घडली होती.

Two robbers robbed of robbery | तरुणाला लुटणारे दोघे दरोडा पथकाकडून जेरबंद

तरुणाला लुटणारे दोघे दरोडा पथकाकडून जेरबंद

णे : तरुणाला मोबाईलवर संपर्क साधत बोलावून घेत मारहाण करुन लुटणा-या दोघाजणांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कात्रज येथे घडली होती.
संजय दगडु मानमोठे (वय 24, रा. मु. टो, पो. कोकलगाव, जि. वाशिम), गजानन बबन लगड (वय 22, रा. खडी मशीन, माऊलीनगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निखील बाळासाहेब चुटके (वय 38, रा. शेलार मळा, महादेवनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुटके यांना आरोपींनी मोबाईलवर संपर्क साधून कात्रज येथे बोलावून घेतले होते. या दोघांनी साथीदारांसह चुटके यांना हाताने व दगडाने मारहाण करुन सोनसाखळी, सोन्याच्या सहा अंगठ्या, मोबाईल असा एकूण 1 लाख 84 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.
निरीक्षक पिंगळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या मानमोठे याला वाशिम येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लगड यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी सोनसाखळी, सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, महत्वाची कागदपत्रे असा एकूण 2 लाख 38 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणपत पिंगळे, सहायक निरीक्षक संदीप जगताप, पोलीस कर्मचारी देवीदास भंडारी, संजय दळवी, विनायक पवार, नासीर पटेल, शरद कणसे, संतोष पागार, निलेश पाटील, प्रदीप शितोळे, दत्तात्रय काटम, राजेंद्र शिंदे, किरण लांडगे, महेश कदम, प्रमोद गायकवाड, विनोद साळुंके, मल्लिकार्जुन स्वामी, धनाजी पाटील, प्रविण जाधव यांनी केली.

Web Title: Two robbers robbed of robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.