शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

दोन विमान अपघात टळले; ५१७ प्रवाशांचा जीव वाचला

By admin | Updated: December 28, 2016 04:54 IST

दोन विमानतळांवर दोन मोठे विमान अपघात टळल्याने ५१७ प्रवाशांचा जीव वाचला. दिल्लीत दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. गोव्यात जेटचे विमान धावपट्टीवरून

नवी दिल्ली/पणजी : दोन विमानतळांवर दोन मोठे विमान अपघात टळल्याने ५१७ प्रवाशांचा जीव वाचला. दिल्लीत दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. गोव्यात जेटचे विमान धावपट्टीवरून घसरल्याने २० प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुबईहून गोवामार्गे मुंबईला जाणारे विमान गोव्यात दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते़ मुंबईला प्रस्थान करण्यास धावपट्टीवर येत असताना दाट धुक्यामुळे वैमानिकाला अंदाज न आल्याने ते धावपट्टीबाहेर गेले़ त्याचवेळी विमानाचे टायर फुटले. वैमानिकाने अचानक ब्रेक लावल्याने विमान वर्तुळाकार फिरले आणि पुढे जाऊन धडकले़ त्यात २० जण जखमी झाले़ - गोव्यात दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या जेट एअरवेजच्या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. काहींनी केबिनच्या दारातून बाहेर पडण्यास गर्दी केल्याने विमान एका बाजूने झुकले़ ते कलंडताच प्रवासी आणखी घाबरले.काहींनी मागील दरवाजातून बाहेर पडण्यास उड्या मारल्या़ काहींचे हात-पाय फ्रॅ क्चर झाले़. काहींना किरकोळ दुखापती झाल्या़ जखमींमध्ये गरोदर महिलेचा समावेश आहे़ नौदलाचे मदतकार्य नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत बचावकार्य सुरू केले. विमानात अडकलेल्या सर्व प्रवाशांना त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढले़ १० प्रवाशांना चिखलीच्या सरकारी कुटीर रुग्णालयात, तर गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ दिल्लीत संदेशवहनाची चूकइंडिगो आणि स्पाइसजेट या खासगी कंपन्यांची विमाने दिल्ली विमानतळावर मंगळवारी सकाळी समोरासमोर आली. मात्र, थोडक्यात मोठा अपघात टळला. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून चुकीच्या संदेशवहनामुळे या विमानांचा अपघात होताहोता टळला, असे सूत्रांनी सांगितले. ही घटना घडली त्या वेळी लखनौहून आलेल्या इंडिगो विमानात १६० तर हैदराबादला निघालेल्या स्पाइसजेट विमानात १८७ प्रवासी होते. या घटनेची चौकशी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने सुरू केली आहे.