आसाममध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 17:56 IST2018-02-15T17:56:29+5:302018-02-15T17:56:42+5:30
आसाममधल्या माजुली जिल्ह्यात हवाई दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

आसाममध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू
इटानगर- आसाममधल्या माजुली जिल्ह्यात हवाई दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या मायक्रोलाइट एअरक्रॉफ्टच्या हेलिकॉप्टरनं नेहमीच्या सरावासाठी जोरहट एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण केलं. त्याच उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टर माजुली नदी किनारी दुर्घटनाग्रस्त झालं. हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या दोन्ही वैमानिकांना ब-याच जखमा झाल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सरकारनं या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही 14 जानेवारी रोजी अरबी समुद्राजवळ पवन हंस हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ज्यात 6 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ओएनजीसीच्या 5 अधिका-यांव्यतिरिक्त एका वैमानिकाचाही समावेश होता.