शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची भीती वाढतेय! नोएडामध्ये दोघांना लागण, देशातील संख्या 134 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 13:03 IST

भार्गव म्हणाले, येथे दोन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही फ्रान्समधून भारतात आले आहेत. या दोघांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देनोएडाच्या सेक्टर 78 आणि 100 मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू जगभरात कोरोनामुळे तब्बल 7,000 हून अधिक जणांचा मृत्यू

नवी दिल्ली -भारतातकोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज नोएडामध्ये 2 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 134 वर पोहोचला आहे. येथील गौतमबुद्ध नगरमधील मुख्य वैद्यकीय अधिकारी अनुराग भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार नोएडाच्या सेक्टर 78 आणि 100 मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

भार्गव म्हणाले, येथे दोन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही फ्रान्समधून भारतात आले आहेत. या दोघांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

या दोन कोरोना बाधितांनंतर आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 134 वर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या वतीने या जीवघेण्यात आजारापासून जनतेचे संरक्षण करण्यासठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण जगभरात या आजाराने तब्बल 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. तर भारतात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाबाधित 13 जण बरे झाले आहेत. भारतातील 12 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाग्रस्तांची संख्या 134 वर पोहोचली आहे.

मुंबईत महाराष्ट्रातील पहिला बळी -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हिंदुजामधील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्‍तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. देशातील कोरोनाबाधित रुग्णाचा हा तिसरा बळी आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत