शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 3:42 PM

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली आहे.

ठळक मुद्देछत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली.चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.डीआरजीचे पथक आणि नक्षलवाद्यामंध्ये ही चकमक झाली.

रायपूर - छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. परिसरात आणखी काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील कटेकल्याण येथे मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी चकमक झाली. डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) चे पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी एक लाखाचे बक्षिस असल्याची माहिती मिळत आहे. 

गडचिरोलीतील कोरची तालुक्यात ग्यारापत्ती जंगल परिसरात रविवारी (15 सप्टेंबर) चकमक झाली होती. पोलिसांच्या सी-60 पथकातील जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास ही चकमक घडली. ग्यारापत्ती जंगल परिसरात सी - 60 पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस पथकानेही नक्षलवाद्यांत्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत काही नक्षली ठार तर काही जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. 

छत्तीसगडमधील नारायणपूर येथे काही दिवसांपूर्वी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी (24 ऑगस्ट) चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. डीआरजीचे दोन जवान या चकमकी दरम्यान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नारायणपूर जिल्ह्यामध्ये सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले होते. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. 

महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव येथे याआधी काही दिवसांपूर्वी चकमक झाली होती. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून त्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले होते. या भागातून नक्षली जात असल्याची खबर छत्तीसगड पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस व सीएएफची पार्टी रवाना झाली. नक्षली व पोलिसांदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर सात नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत ए.के. 47, 303 रायफल, 12 बोर बंदुका व अन्य नक्षल सामग्री ताब्यात घेतली होती. या चकमकीत तीन पोलिस जवान जखमी झाले होते. 

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी