दोन मोटारसायकलींची धडक; एक ठार घाटात भरदुपारी झाला अपघात नगरसेवकाने केली तातडीने मदत पातूर घाटात झालेल्या अपघातात राहुल इंगळे हा जखमी अवस्थेत पडून असताना
By Admin | Updated: February 23, 2016 02:01 IST2016-02-23T02:01:01+5:302016-02-23T02:01:01+5:30
पातूर: नजीक वाशिम रस्त्यावर असलेल्या घाटात दोन मोटारसायकलींची जोरदार धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली.

दोन मोटारसायकलींची धडक; एक ठार घाटात भरदुपारी झाला अपघात नगरसेवकाने केली तातडीने मदत पातूर घाटात झालेल्या अपघातात राहुल इंगळे हा जखमी अवस्थेत पडून असताना
प तूर: नजीक वाशिम रस्त्यावर असलेल्या घाटात दोन मोटारसायकलींची जोरदार धडक होऊन एक जण ठार झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली.नजीकच्या आष्टुल येथील राहुल इंगळे हा त्याच्या एम.एच.३० ए.डी.८००१ क्रमांकाच्या मोटारसायकलने मेडशीकडे जात असताना मेडशीकडून येणार्या एम.एच.३७ के.१९६७ क्रमांकाच्या मोटारसायकलशी धडक झाली. या अपघातात राहुल माणिक इंगळे याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी तातडीने अकोला येथे रवाना केले; परंतु तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पी.व्ही. फाडे, हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. हे वृत्त लिहिपर्यंत पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. (वार्ताहर)