भारतीय आणखी दोन मुली सौदी अरेबियात बेपत्ता; पालक काळजीत, सरकारला मदतीचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 10:20 IST2023-07-24T10:20:23+5:302023-07-24T10:20:55+5:30
पंजाबमधील आणखी दोन तरुणी संयुक्त अरब अमिरातीत बेपत्ता झाल्या आहेत. आठवडाभरापासून पालकांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भारतीय आणखी दोन मुली सौदी अरेबियात बेपत्ता; पालक काळजीत, सरकारला मदतीचे साकडे
अमृतसर : पंजाबमधील आणखी दोन तरुणी संयुक्त अरब अमिरातीत बेपत्ता झाल्या आहेत. आठवडाभरापासून पालकांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मनप्रीत कौर (२५) व हरप्रीत कौर (२१) अशी या दोघींची नावे आहेत. भाजपचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी सोशल मीडिया अकाउंटवर या घटनेची माहिती देत अबुधाबीतील भारतीय दूतावासाला त्यांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. या दोघी शारजाह येथे कामासाठी गेल्या होत्या.
एजंटांच्या जाळ्यात
पंजाबमधील काही भामट्या एजंटांच्या जाळ्यात अडकून अनेक तरुणी आणि तरुण दुबईला जातात. तेथे त्यांचे शोषण होते. अलीकडेच कुलदीप धारिवाल यांनी दुबईतील एका तरुणीची सुटका केली होती.