कुलगाम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 23:06 IST2019-01-12T23:05:41+5:302019-01-12T23:06:03+5:30

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाममधील काटापोरा भागात ही चकमक झाली ...

Two militants killed in encounter in Kulgam | कुलगाम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

कुलगाम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाममधील काटापोरा भागात ही चकमक झाली असून, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके-47 रायफल आणि अन्य सामान जप्त करण्यात आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वाँटेड दहशतवादी जीनत उल इस्लाम हासुद्धा सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा एक गट लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने जम्मू काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफसोबत संयुक्त ऑपरेशन सुरू केले. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी एका घराआडून जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.  



 

Web Title: Two militants killed in encounter in Kulgam