श्रीनगरमध्ये लष्करच्या कमांडर मोहम्मद शेखसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 20:50 IST2021-08-23T20:50:34+5:302021-08-23T20:50:41+5:30
Jammu-Kashmir:मोहम्मद शेख हा सर्वात जुन्या दहशतवाद्यांपैकी एक होता.

श्रीनगरमध्ये लष्करच्या कमांडर मोहम्मद शेखसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर:जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी 2 मोठ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित होते. श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत दोघे ठार झाले. त्यापैकी एक म्हणजे लष्करचा कमांडर मोहम्मद अब्बास शेख आणि दुसरा साकिब मंजूर आहे.
श्रीनगरचे आयजी विजय कुमार यांनी दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारणं हे मोठे यश असल्याचं वर्णन केलं आहे. अब्बास शेख आणि साकीब मंझूर या दोघांचाही या वर्षी पोलिसांनी जारी केलेल्या वांटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होता. कुलगामच्या रामपूर गावातील सूत्रांनी सांगितल्यानुसार, शेख हा दक्षिण काश्मीर जिल्ह्याचा सर्वोच्च कमांडर होता.
45 वर्षीय शेख हा सर्वात जुन्या दहशतवाद्यांपैकी एक होता. तो यापूर्वी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित होता. सूत्रांनी सांगितलं की, शेख रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा भाग होता. पोलीस याला लष्कर-ए-तय्यबाचा सावली गट मानतात. मागील 6 वर्षांपासून तो पोलीसांना हुलकावणी दे तहोता.