रामाचा जयजयकार न केल्यानं मुस्लिम दाम्पत्यावर हल्ला; महिलेचा लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:26 IST2019-10-07T13:24:55+5:302019-10-07T13:26:03+5:30

मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

Two men beat up Muslim couple in alwar sexually harass woman for not chanting Ram Ram | रामाचा जयजयकार न केल्यानं मुस्लिम दाम्पत्यावर हल्ला; महिलेचा लैंगिक छळ

रामाचा जयजयकार न केल्यानं मुस्लिम दाम्पत्यावर हल्ला; महिलेचा लैंगिक छळ

अलवार: रामाचा जयजयकार न केल्यानं मुस्लिम दाम्पत्यावर हल्ला झाल्याची घटना  राजस्थानमधील अलवारमध्ये घडली. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. मुस्लिम दाम्पत्य हरयाणाला जात असताना अलवारच्या बस स्थानकात दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या तरुणांनी महिलेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत तिच्यासोबत गैरवर्तन केलं. 

अलवारच्या बस स्थानकात मुस्लिम दाम्पत्य त्यांच्या मुलासह जेवत होतं. त्याचवेळी दोन तरुण तिथे आले. त्यांनी दाम्पत्याला रामाचा जयजयकार करण्यास सांगितलं. यानंतर या तरुणांनी पतीला मारहाण केली आणि महिलेशी असभ्य वर्तन केलं. दाम्पत्याला मारहाण करणाऱ्यांची नावं वंश भारद्वाज आणि सुरेंद्र भाटिया असल्याची माहिती मिळत आहे. भारद्वाज आणि भाटिया यांनी मारहाण करताच मुस्लिम दाम्पत्यानं मदतीसाठी याचना सुरू केली. यानंतर परिसरातील काही जण मदतीसाठी धावले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

मुस्लिम दाम्पत्यानं भारद्वाज आणि भाटिया यांचा विरोधात अलवारमधील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाम्पत्य पीडित महिलेच्या माहेराहून (दिंडवाना) हरयाणातील नूहमधील त्यांच्या घरी जात असताना हा प्रकार घडला. दाम्पत्य आणि त्यांचं लहान मूल अलवारच्या बस स्थानकात जेवत असताना दोन जण तिथे आले. त्यांनी दाम्पत्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मुस्लिम हिंदुस्तानात राहतात. मात्र ते रामाचा जयजयकार करत नाहीत, असं म्हणत दोघांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप दाम्पत्यानं केला. 
 

Web Title: Two men beat up Muslim couple in alwar sexually harass woman for not chanting Ram Ram