शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

लालूंची तुरूंगात सेवा करण्यासाठी दोन सहाय्यकांनी खोट्या प्रकरणात स्वतःला केलं सरेंडर, पोलिसांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 13:24 IST

चारा घोटाळाप्रकरणात तुरूंगांत शिक्षा भोगत असलेले राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सेवा करण्यासाठी दोन सहाय्यक तुरूंगाच पोहचले आहेत.

रांची- चारा घोटाळाप्रकरणात तुरूंगांत शिक्षा भोगत असलेले राजदचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सेवा करण्यासाठी दोन सहाय्यक तुरूंगाच पोहचले आहेत. या दोन साहाय्यकांनी एका खोट्या प्रकरणात स्वतःला पोलिसांकडे सरेंडर केलं. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने लालूंना दोषी ठरविल्याच्या दिवशीच या दोघांनी एका खोट्या प्रकरणात स्वतःला सरेंडर केलं. पोलिसांनी हा दावा केला असून सध्या या प्रकरणाची चौकशी केली जाते आहे. 

या दोघांपैकी एकाचं नाव मदन यादव असून तो दोन गोशाळा, एक घर व एका एसयुव्ही गाडीचा मालक आहे. रांची चे राहणारे मदन यादव हे सुमित यादव नावाच्या व्यक्तीकडून दहा हजार रूपये हिसकावून घेण्याच्या आरोपात बिरसा मुंडा तुरूंगात आहेत. या प्रकरणात त्यांचा मित्र लक्ष्मण यादव यांनी मदत केल्याचा दावा त्यांनी केला आहे. लक्ष्मण यादवही सध्या या कथित प्रकरणात बिरसा मुंडा तुरूंगात आहे. दरम्यान, राजद या दोघांना लालूंचं सहाय्यक न मानता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं सांगत आहे. मदन यादव व लक्ष्मण यादव तुरूंगात कसे गेले? या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करायला हवी. लालूंनी कधीही कुणालाही तुरूंगात जायला सांगितलं नव्हतं, असं राजदचे प्रवक्ते शक्ति सिंह यांनी म्हंटलं. 

पोलिसांच्या दाव्यामुळे बनतिये एक रंजक कहाणीपोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, सुमित नावाच्या व्यक्तीने 23 डिसेंबर रोजी मदन आणि लक्ष्णच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पण त्यावेळी पोलिसांना कुठलाही संशय आला नाही. याच दिवशी लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यासाठी दोषी ठरविण्यात आलं. विशेष म्हणजे त्याच दिवशी मदन व लक्ष्मण या दोन आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये सरेंडकर केलं. त्या दोघांनी बिरसा मुंडा तुरूंगात पाठविण्यात आलं.  

गावातून अचानक मदन गायब झाल्यावर तेथिल लोकांना संशय आला. मदनला ओळखणाऱ्या एका चहा विक्रेत्याने सांगितलं की, मदनची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. त्यांना चोरी किंवा कुणाकडून पैसे हिसकावून घेण्याची काहीही गरज नाही. मदन निश्चितपणे लालूंची सेवा करायला तुरूंगात गेले, असंही चहा विक्रेते मनोज कुमार यांनी म्हंटलं. 

मदन यादव हे लालू प्रसाद यादव यांच्या चांगले ओळखीचे असल्याची माहिती पोलिसांना समजली. लालू जेव्हा रांचीमध्ये यायचे तेव्हा मदन त्यांची सेवा करायचे. या माहितीनंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मदनचे मित्र लक्ष्मण यांनीसुद्धा याआधी लालूंसाठी स्वयंपाकी म्हणून काम केलं आहे. पोलिसांकडून आता 23 डिसेंबर रोजी नेमकं काय घडलं ? याचा तपास केला जातो आहे.  

टॅग्स :Fodder scamचारा घोटाळाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवjailतुरुंगPoliceपोलिस